रोज केळी खाणे आवश्यक आहे…..

आहारमूल्यांचे उच्च प्रमाण असूनही स्वस्त दरात उपलब्ध होणारी केळी ‘गरीबांच फळ’ म्हणून प्रसिद्ध आहे.
इस्टण्ट एनजीर्, तणावमुक्ती आणि अन्नपचनाची क्रिया सुलभरित्या होण्यासाठी रोज किमान एक केळी खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. केळीमध्ये पोटॅशियम, ट्रायप्टोफन प्रोटीन, फायबर, काबोर्हायड्रेटस, अॅमिनो अॅसिड, विटॅमीन ए, बी सिक्स आणि सी तसेच सुक्रोस, फ्रुक्टोस, ग्लुकोज या प्रकारची नॅचरल शुगर, आणि फॉस्फरस या आहारमूल्यांचा समावेश आहे.

मेंदूला नियमीतपणे ऑक्सीजनचा पुरवठा करणं, हदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवून त्याचं कार्य सुरळीतपणे चालू ठेवणं, शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखणं या कामांसाठी शरीराला पोटॅशियम आवश्यक असतं. माइन्ड या हेल्थ ऑर्गनायझेशनच्या संशोधनानुसार केळीमध्ये असलेल्या ट्रायप्टोफन नावाच्या प्रोटीनमुळे मानसिक ताण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे सतत कामाचा ताण असणाऱ्या व्यक्तींच्या आहारात केळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच बी सिक्स विटॅमीनमुळेही मनावरचा ताण हलका होतो. आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवता येते. केळीमधील सुक्रोस, फ्रुक्टोस, ग्लुकोज या नॅचरल शुगरमुळे तसेच काबोर्हायड्रेटमुळे शरीराला त्वरीत उर्जा मिळते. म्हणून खेळाडंूना स्टॅमिना आणि रूग्णांना प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या आहारात केळी खाण्याला प्राधान्य दिले जाते.

केळीमध्ये ७४ टक्के पाणी असल्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. म्हणून रोज जेवणानंतर किमान एक केळ खाण्यावर भर दिला पाहिजे. स्नायू आणि हाडे बळकट करणाऱ्या कोलॅजिन फायबरची निमिर्ती करण्यासाठी विटॅमीन सी आवश्यक आहे. तसेच विटॅमीन सी आणि ए हे निरोगी दात, त्वचा, डोळ्यांसाठी आणि जखम त्वरीत भरून काढण्यासाठी गरजेचं आहेत. या सर्व गुणधर्मामुळे उच्च रक्तदाब, हदयविकार आणि कॅन्सर पेशण्टला केळी खाणे फायदेशीर ठरतं. पिकलेलं केळ चेहऱ्याला लावल्यास त्वचेला चकाकी येऊन चेहरा गुळगुळीत होतो. तसेच चामखिळीवर उपचार करण्यासाठी केळीचा पल्प लावणे परिणामकारक ठरतं. या सर्व उच्च आहारमूल्यांमुळे डॉक्टरांपासून चार हात लांब राहण्यासाठी रोज केळी खाणे आवश्यक आहे.

~ by manatala on जुलै 25, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.