पर्यटकांच्या गर्दीने धबधबे फुलले

पावसाच्या दमदार आगमनाने रायगड जिल्ह्यातील धबधब्यांवर सध्या पर्यटकांची रिघ लागली आहे. मुंबईला अगदी जवळ असल्याने डोंगरमाथे तसेच धबधब्यांचा आनंद घेणारे पर्यटक नेहमीच रायगडला पहिली पसंती देतात. जूनचा तिसरा आठवडा उजाडला की धबधबे वाहायला सुरुवात होते. याला यंदाचा थोडासा अपवाद होता. मात्र , २३ जूनपासून पावसाने जोरदार वृष्टी केल्यामुळे समुदाकडे वळलेला पर्यटक पुन्हा धबधब्यांकडे वळला आहे. मात्र , धबधब्यावर चालणाऱ्या धिंगाण्यामुळे तेथे पोलिसांची करडी नजर असणार आहे.

मुंबईपासून कर्जत-खालापूरची अगदी एक दिवसात सफर होते. त्यामुळे कर्जत व खालापूर परिसरात धबधब्यात धमाल करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माथेरान डोंगराच्या कुशीत हिरव्याकंच झाडीत आशणे-कोशणे धबधबा मुंबईकरांच्या स्वागताला सज्ज झाला आहे. गेल्यावषीर् गटारी अमावस्येला येथे अंदाजे १० हजार पर्यटकांनी गदीर् केली होती. मिनी ट्रेनमधून माथेरानला जाताना अनेक मनाला आणि डोळ्यांना आनंद देतात. कोंदीवडे , मांडवणे , भिवपूरी , पाली , मोहीली आदी ठिकाणांवरील धबधब्यांनीही आता पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. खोपोलीचा झेनिथ धबधबा हे सर्वांना ठावूक असलेले ठिकाण आहे.

झेनिथ धबधब्यात दरवषीर् किमान पाच लाख पर्यटक डुंबण्याचा आनंद घेतात. दोन वर्षांपूवीर् मात्र , येथील खालच्या बाजूच्या ओढ्यातून पाचजण वाहून गेले होते. त्यामुळे येथे सोयीसुविधा उपलब्ध केल्यास अशा दुर्घटना टाळून पर्यटकांच्या संख्येत वाढ करता येईल. काही महिन्यांपूवीर् खोपोली पालिकेने झेनिथवर येणाऱ्या पर्यटकांकडून कर वसुलीला सुरूवात केली होती. मात्र , पालिका कोणत्याही सुविधा न देता कर घेत असल्याने पुढे विरोधामुळे करवसुली मागे घ्यावी लागली.

पर्यटक वाहून गेलेल्या ठिकाणी लोखंडी पूल बांधणे आजुबाजुच्या परिसरात रेलिंग , पाकिर्ंगची व्यवस्था , बेन्च या सुविधा पुरवल्यास सुरक्षित स्थळ म्हणून आधिक पर्यटक येथे येऊ शकतात. सुधागड-पाली भागातही अनेक नयनरम्य धबधबे आहेत. येथेही मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र , अतिउत्साही तळीराम पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालणे , दारुच्या बाटल्या फोडणे , प्लास्टिकच्या पिशव्या तेथेच टाकणे असे प्रकार करून इतरांच्या आनंदावर पाणी ओततातच परंतु , अनावश्यक कचरा करून परिसराचे संतुलनही बिघडवतात.

~ by manatala on जुलै 12, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा