केसांच्या समस्यांचे कारण काय?

तुटके, दुखापत झालेले केस म्हणजे केसाचा धागा खडबडीत होणे, तुटणे, दोन टोके येणे किंवा पिचणे होय. केसांमधे जटा, दोन टोके येणे, निजीर्व होणे आणि शुष्कता येणे, पिंजारलेले राहाणे इ. (ही सर्व लक्षणे केसांच्या अनारोग्याची दर्शक आहेत) परिणाम मुख्यत: काळजी न घेण्याने दिसून येतात. कधी कधी केसांसाठी चुकीची उत्पादने वापरणे हेही कारण असू शकते.

………………….

होे, त्याचीही तयारी ठेवायला हवी! आज तुमचे केस वेडेवाकडे कापले जाणे किंवा केसांवरच्या संकटाचाही दिवस ठरू शकेल; कारण आज आहे आंतरराष्ट्रीय बॅड हेअर डे! ते काहीही असो, पण काळजी करू नका, अशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला एक परिपूर्ण उपाय योजना देणार आहोत. तुम्ही तुमच्या केसांची योग्यरीत्या निगा राखली नाहीत किंवा जाणीवपूर्वक काळजी घेतली नाहीत तर असे बॅड हेअर डे वारंवार येतील. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल तर तुमचे केसही चमकदार आणि तुमच्या सौंदर्यात भर घालणारे राहतील. मानसिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल तर तुमचे केसही निजीर्व आणि रखरखलेले होतील. पुढे केस गळायला लागतील आणि सेबॅशियस ग्रंथींमधून अतिरिक्त सावामुळे ते चिकट, मेणचट होऊ लागतील.

केसांच्या समस्यांचे कारण काय?

तणाव : ताणतणावाचा परिणाम ज्याप्रमाणे, हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवावर होतो तसाच तुमच्या केसांवरही होतो. तणावामुळे केस गळायला लागतात आणि एखाद्या धक्कादायक घटनेनंतर तीन ते सहा महिन्यांनंतरही केसांच्या समस्या सुरू होऊ शकतात.

तुमच्या शरीराला आणि मनाला संतुलन आलं आणि त्या धक्कादायक घटनेचा प्रभाव ओसरल्यावर केसगळती थांबते. म्हणूनच ताणतणावाच्या व्यवस्थापनाचं तंत्र प्रभावीपणे वापरलं तर आपण केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो.

तुटके केस : तुटके, दुखापत झालेले केस म्हणजे केसाचा धागा खडबडीत होणे, तुटणे, दोन टोके येणे किंवा पिचणे होय. केसांमधे जटा, दोन टोके येणे, निजीर्व होणे आणि शुष्कता येणे, पिंजारलेले राहाणे इ. (ही सर्व लक्षणे केसांच्या अनारोग्याची दर्शक आहेत) परिणाम मुख्यत: काळजी न घेण्याने दिसून येतात. कधी कधी केसांसाठी चुकीची उत्पादने वापरणे हेही कारण असू शकते. केस तुटके खरखरीत झाल्यावर ते बरे करता येत नाहीत कारण त्यांची सूक्ष्म खवल्यांची रचना बिघडते. हे खवले मृत होतात. आपण फक्त त्यांचा दृश्य परिणाम थोडा फार सुधारू शकतो. केसांना दुखापत होण्याच्या कारणांची यादी बरीच मोठी आहे. वारंवार केस धुणे किंवा फार खसखसून केस धुणे, सतत विंचरणे किंवा कंगवे फिरवत राहाणे, जास्त तापमानाचे ब्लो ड्रायर्स किंवा केशरचनेची साधने वापरणे, ब्लीचिंग, रंगवणे, कुरळे करणे तसंच केस सरळ करणे ही सगळी त्यांपैकी कारणे आहेत. केस रंगवण्यामुळेही केसांना दुखापत होऊ शकते कारण वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये काही प्रमाणात रासायनिक दव्ये असतातच. सूक्ष्म खवलेयुक्त केसांवर, खवल्यांमध्ये मूळ केसाच्या धाग्यावर रंग पक्का बसावा म्हणून ही रासायनिक दव्ये वापरण्यात येतात. म्हणून तर रंग दीर्घकाळ राहतो. ही रसायने नसतील तर लगेचच्या केस धुण्यामध्ये रंग उडून जाईल. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने केसांवर रासायनिक लहर प्रक्रिया करणे हीदेखील दुखापतीची कारणे ठरू शकतात.

वारंवार खाऱ्या पाण्यात पोहण्यामुळेही केस शुष्क होतात आणि तुटके होतात. दीर्घकाळाच्या हवाई प्रवासामुळेही केसांना इजा होऊ शकते कारण केबिनमधील दाब कमी अधिक वारंवार झाल्यामुळे केसांखालील त्वचेचा ओलावा नष्ट होतो. हवाईसुंदरी आणि विमानातील अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही समस्या अनेक वेळा दिसून येते.

काही उत्पादनं, औषधं तुमच्या केसांना सुधारू शकतात, पण कितीही दावे करत असले तरी अशी उत्पादनं केस कायमचे आरोग्यपूर्ण करू शकत नाहीत. यावर उपाय एकच तो म्हणजे नवीन केस उगवण्याची वाट पाहाणं आणि त्यानंतर केस आरोग्यपूर्ण ठेवायच्या सवयी लावून घेणं.

मधल्या काळात त्यातल्या त्यात केस सौंदर्यपूर्ण करण्याचे काही उपाय आहेत. तुमची त्वचा तेलकट नसेल तर वारंवार केस धुणं टाळावं. जेव्हा केस धुता तेव्हा प्रथिनयुक्त आणि ग्लिसरीन, पँथेनॉल आणि क्वॉटेनिर्यम-२२ यांसारख्या ह्युमेक्टंटसयुक्त कंडिशनरचा (लेबलवर त्याची खात्री करून घ्या) वापर करावा. या घटकांमुळे केस आणि ओलावा यांचा संबंध टिकून राहतो. शुष्कता येत नाही. तुमची केसांखालील मस्तकाची त्वचा तेलकट असेल तर कंडिशनरचा वापर फक्त केसांच्या टोकांवर करावा कारण केसांच्या मुळाशी वापरल्याने त्याचं वजन भारी होईल. केस वाळवताना ते मऊ पंचाने वा टॉवेलने हलकेच टिपून घ्यावे, जादाचं पाणी निथळून काढावे, उगाच केस खसखसून पुसू नयेत. केस ओले असताना अतिशय हलक्या हाताने सोडवावेत वा विंचरावेत कारण या अवस्थेत ते अतिशय कमकुवत होतात. शेवटी केस सरळ करण्यासाठी, जटा काढण्यासाठी, केसाचा धागा मऊसूत मुलायम करण्यासाठी तसंच त्यावर चमक आणण्यासाठी सिलिकॉन सीरमचा थेंब वापरावा.

केसांना तेल लावण्यापूवीर् केसांखालील त्वचा स्वच्छ असावी. दररोज केस विंचरण्याची सवय ठेवावी. ते विंचरताना खालच्या दिशेने कंगवा वापरावा. केस ओले असताना ब्रशचा वापर करू नये कारण यावेळी केस कमकुवत असल्याने पटकन तुटतात. केसांना तेल लावताना अतिशय काळजीपूर्वक डोक्याच्या त्वचेला मसाज करा म्हणजे केसांच्या मुळापर्यंत रक्ताभिसरण वाढेल.

कोंडा : केसातल्या कोंड्याचा त्रास असलेल्यांसाठी तुटक्या केसांचे दिवस वारंवार येतात. केसातला कोंडा ही समस्या अनेकजणांना असते एवढंच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात ही समस्या एकदा तरी सतावून राहिलेली असते. ‘पिटायरोस्पोरम ओव्हेल’ नावाच्या एक प्रकारच्या नैसगिर्क बुरशीमुळे, तिच्या अतिरिक्त उत्पादनामुळे ही समस्या उद्भवते. संप्रेरकांचे असंतुलन जादा तेलकट त्वचा अथवा कुपोषित करणारा आहारही याला कारणीभूत ठरू शकतो.

त्वचेतील मृत पेशी सर्वांच्याच त्वचेतून बाहेर टाकल्या जातात, पण कोंड्याची समस्या असणाऱ्यांमध्ये हे प्रमाण जादाच असते. कारण या पेशींची गोळा होण्याची वृत्ती असते आणि त्यामुळे त्या चटकन दिसून येतात. काहींच्या बाबतीत, कोंडा वाटणारी चीज ही केवळ शुष्क मस्तकत्वचेतील नैसगिर्क मृत पेशींचे एकत्रिकरण असू शकते.

मस्तकत्वचा स्वच्छ राखणे, एक दिवसाआड केसांना शॅम्पू लावून धुणे अशा साध्या उपायांनी या केसातल्या कोंड्यावर नियंत्रण आणता येते. मात्र अतिरिक्त त्रास झाल्यास तज्ज्ञ ट्रायकॉलॉजिस्टकडे जाणे आणि त्यांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे अधिक हितावह ठरेल.

~ by manatala on जुलै 12, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा