या ब्लॉगबद्दल थोडेसे

 

रामराम मंडळी. डायरेक्ट मराठीमधून असा हा माझा पहीलाच ब्लॉग आहे. तेव्हा चुकभुल द्यावी घ्यावी. जर ही साइट तुम्ही ऑपेरा , फायरफॉक्स अथवा इतर कुठल्या ब्राउजर वरुन पाहात असल्यास कृपया मेन्यु मधील व्ह्यु वर क्लिक करुन तुमच्या गरजेनुसार अक्षरांचा साइज वाढवून घ्या. किंवा त्याहीपेक्षा सोपा उपाय म्हणजे तुम्ही जर ‘स्क्रोल माऊस’ वापरत असाल तर हा उपाय करा. प्रथम तुमच्या कळपटलावरील ( कीबोर्ड )’कंट्रोल’ची कळ दाबून ठेवून तुमच्या स्क्रोल माऊस ची स्क्रोल चकती तुमच्या दिशेने एकदाच फिरवा. अक्षरांचा साइज वाढेल. तुम्हाला हवा तेवढा साइज वाढेपर्यंत हा उपाय करा. या साइट वर तंत्रद्यानाशी संबधित शब्द इंग्लिश मधूनच वापरले आहेत अन्यथा वाक्यांचा क्लिष्टपणा वाढला असता. मुळात मी काही लेखक नाही, आणि रोजच्या वाचनात इतक्या घडामोडी येत असतात, इतकी वैविध्यपूर्ण माहिती असते तीच जर जपून ठेवता आली तर उत्तम या हेतूने मी आता मला आवडलेली किंव्हा उपयुक्त वाटलेली माहिती मी इथे संकलीत करत आहे. लेखकाचे नावही लिहिलेले असेल. अधूनमधून माझेही लिखाण वाचायला मिळेलच.

 

 साहाय्य : माझी दुनिया


तुमचा अभिप्राय नोंदवा